विजग्राहक संघटना सिंधुदुर्ग व व्यापारी संघटना सिंधुदुर्ग संलग्न वीज ग्राहक संघटना सावंतवाडीची विभागीय बैठक ग्रामपंचायत सभागृह बांदा येथे बुधवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ठीक ०४:०० वाजता घेण्यात येणार आहे. सर्व वीज ग्राहकांनी वीजे संदर्भात काही तक्रार असल्यास लेखी तक्रार घेऊन बैठकीला उपस्थित राहावे .सर्व सरपंच यांनी वीजग्राहक संघटनेच्या बैठकीला उपस्थित राहून आपआपल्या गावातील वीज समस्ये बाबत चर्चा करून संघटनेच्या माध्यमातून वीज समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे. घरगुती मीटर ,शेतीमीटर ,व्यावसायिक मीटर, वीज बिल,नादुरुस्त मीटर,वाढीला बिले,बंद घरगुती वीज मीटर वीज वितरणकडे अर्ज देऊन वर्षभर न बदलणे बाबत तक्रारी असल्यास लेखी तक्रारी घेऊन वीज ग्राहक संघटनेकडे द्याव्यात सदर बैठकीला जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष श्री.श्रीराम शिरसाठ, उपाध्यक्ष नितीन म्हापणकर,दीपक पटेकर ,सचिव श्री.निखिल नाईक जिल्हा समन्वयक श्री.नंदन वेंगुर्लेकर, श्री.बाळा बोर्डेकर व जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. तरी सावंतवाडी वीज ग्राहक संघटनेचे कार्यकारी सर्व पदाधिकारी/सदस्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष श्री.संजय लाड यांनी केले आहे.
Previous Articleपेडण्यातील ‘झोनिंग प्लॅन’ स्थगित
Next Article अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या चौघांना पकडले
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg