यापूर्वी 30 दिवसांचा पूर्ण केलाय प्रयोग
पाण्यात एखाद्या डब्यात बंद होऊन तुम्ही काही मिनिटे घालवू शकता का? एकटेपणा, पाण्याचा दबाव, शांतता असहय़ ठरण्याची शक्यता असते. परंतु अमेरिकेचा एक वैज्ञानिक 1 मार्चपासून फ्लोरिडाच्या कीस येथे 30 फूट खोल पाण्यात राहत आहे. हा वैज्ञानिक महिन्यापेक्षा अधिक काळ पाण्यात असून त्याचे नाव जोसेफ दितुरी उर्फ जो दितुरी आहे.
पाण्यात 100 दिवस घालविण्याचा विक्रम नोंदविण्याचा जोसेफ यांचा प्रयत्न आहे. सध्या पाण्याच्या 592 चौरस फुटांच्या बॉक्समध्ये ते कैद आहेत. 100 दिवस सलग पाण्यात राहण्यास त्यांनी यश मिळविल्यास पाण्यात राहण्याचा जुना विक्रम ते मोडीत काढणार आहेत. यादरम्यान जोफ हायपरबेरिक प्रेशरमुळे शरीरावर पडणाऱया प्रभावाची पडताळणी करणार आहेत.
जोसेफ हे माजी नौसैनिक तसेच बायोमेडिकल इंजिनियर आहेत. हायपरबेरिक प्रेशर म्हणजेच समुद्राच्या पृष्ठभागावर हवेच्या दबावाच्या तुलनेत पाण्यातील दबाव अत्यंत अधिक असतो. यालाच हायपरबेरिक प्रेशर म्हटले जाते. दितुरी यांचा प्रयोग वेगळा आहे, कारण त्यांचा बॉक्स पाणबुडीप्रमाणे सीलबंद नाही, तसेच त्यात कुठलाच एअरलॉक नाही, बॉक्समध्ये पाणी देखील जात आहे.
या बॉक्समध्ये एअरपॉकेट तयार करण्यात आलेला असून ज्यात ते मधेमध्ये विश्रांतीसाठी जात असतात. बॉक्समध्ये पाण्याचा एक पूल आहे. याच पूलाद्वारे ते खुल्या समुद्रात ये-जा करत आहेत. बॉक्समधील एअरपॉकेट सागरी दबावाने घेरलेला आहे. 30 फूट खोलवर पृष्ठभागाच्या तुलनेत हवेचा दाब दुप्पट असणार आहे.
दीर्घकाळापर्यंत पाण्यात राहणे नुकसानदायक ठरू शकते. एक माजी नौसैनिक म्हणून जोसेफ यांना कशाप्रकारचे नुकसान होऊ शकते याची जाणीव आहे. आमच्या शरीराने पर्यावरणानुसार जगणे शिकले आहे. अनेक पिढय़ांपासून त्यात पर्यावरण आणि हवामानानुसार बदल झाले आहेत. समुद्रात राहून इव्होल्युशनची प्रक्रिया समजून घेणे सोपे ठरेल असे जोसफ यांनी म्हटले आहे.
पाण्यात राहताना केवळ ऑक्सिजन आणि सीओ2 च फुफ्फुसांना मिळणार आहे. हे दोन्ही वायू आमच्या फुफ्फुसांपयंत जातात अन् बाहेर पडतात, मग रक्तात मिसळतात, परंतु दाब वाढल्यावर नायट्रोजन फुफ्फुस अन् रक्तात पोहोचतो. 33 ते 98 फुटांच्या खोलीवर असलेल्या जोसेफ यांना यामुळे एखादी नशा केल्याचे वाटू लागू शकते. या स्थितीला नार्कोसिस म्हटले जाते. वैज्ञानिकांना यामागील कारण अद्याप जाणून घेता आलेले नाही.
इम्युनिटी घटली
सूर्यप्रकाश कमी मिळाल्याने जोसेफ यांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण झालेली असेल. यामुळे त्यांच्या हाडांचे घनत्व, स्नायूंची कार्यशैली आणि इम्युनिटी कमजोर होईल. पाण्यात राहिल्यावर 14 दिवसातच मानवी इम्युनिटी कमी होत जाते. जोसेफ यांनी यापूर्वी एक महिन्यापर्यंत पाण्यात वास्तव्य केले आहे.