कोल्हापूर/ प्रतिनिधी
माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना शिवाजी विद्यापीठाची शिक्षणशास्त्र विषयातील विद्यावाचस्पती पदवी नुकतीच घोषित केली आहे . “निम्न प्राथमिक स्तरावरील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील पुनर्रचित अभ्यासक्रम अंमलबजावणीच्या सद्य : स्थितीचा तौलनिक अभ्यास ” या विषयावरती संशोधन करून ज्ञानरचनावादी अध्ययन – अध्यापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची वर्तमानकालीन स्थिती याविषयी वस्तूस्थितीदर्शक निष्कर्ष मांडले आहेत . तसेच शासनाला व शिक्षकांना संशोधनाच्या निष्कर्षांच्या आधारे शिफारशी केलेल्या आहेत . डॉ . रामचंद्र बेलेकर , माजी प्राचार्य , आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय , गारगोटी यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ आंबोकर यांनी संशोधन कार्य पूर्ण केले आहे . तसेच प्रा . डॉ . नीलमा सप्रे , विभाग प्रमुख डॉ . पाटणकर तसेच एम . फिलच्या मार्गदर्शिका प्रा . डॉ . पुष्पा वासकर , प्राचार्य डॉ आय . सी . शेख , प्रा . डॉ . सर्जेराव चव्हाण यांचेही अमूल्य मार्गदर्शन श्री एकनाथ आंबोकर यांना लाभले आहे . डॉ . एकनाथ आंबोकर यांच्या संशोधनासाठी रत्नागिरी तालुक्यातील तत्कालीन केंद्रप्रमुख यांचे सहकार्य लाभले . तसेच तत्कालीन गटशिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत व तत्कालीन शिक्षणाधिकारी चंद्रकांत गावडे यांचेही सहकार्य लाभले . या सर्वांच्या सहकार्याबद्दल डॉ . एकनाथ आंबोकर यांनी या सर्वांचे ऋण व्यक्त केले आहेत . जीवनाच्या व पीएच . डी . च्या प्रवासात अनमोल साथ दिली ती पत्नी डॉ . अनिता , चिरंजीव यश व चिरंजीव अंश यांनी . डॉ . अनिता यांच्या सहकार्यामुळेच मी पीएच . डी . पूर्ण करू शकलो असे एकनाथ आंबोकर यांनी सांगितले . डॉ . एकनाथ आंबोकर हे सध्या शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) जिल्हा परिषद , कोल्हापूर येथे कार्यरत आहेत . डॉ . एकनाथ आंबोकर यांचे राहुल रेखावार ( जिल्हाधिकारी ) , संजयसिंह चव्हाण ( मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक ) , जिल्हा परिषद कोल्हापूर , श्री . जयंत आजगावकर ( शिक्षक आमदार , पुणे विभाग ) , यांनी अभिनंदन केले . खाते प्रमुख , जिल्हा परिषद , कोल्हापूर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्ष व शिक्षकेत्तर संघटना व शिक्षकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे