सावंतवाडी : प्रतिनिधी
नुकत्याच घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक सरकारी अभियोक्ता या परीक्षेमधून सहाय्यक सरकारी अभियोक्ता महाराष्ट्र राज्य ( वर्ग 1) पदी नुकतीच ॲड .आरती पवार यांची निवड झाली.सध्या त्या सिंधुदुर्ग येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे कार्यालयात सहाय्यक लोक अभिरक्षक या पदी कार्यरत आहेत.त्यांनी एलएल.बी चे शिक्षण कराड येथील लॉ कॉलेज येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सावंतवाडी तालुका व सिंधुदुर्ग मधील इतर तालुका व सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात तसेच गोवा येथील न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रॅक्टिस केली.सहाय्यक सरकारी अभियोक्ता या परीक्षेसाठी अँड.आरती पवार यांनी अहोरात्र मेहनत घेतली व त्यामुळे त्या पहिल्या प्रयत्नात यश संपादन करण्यात यशस्वी झाल्या.सदर यशाचे श्रेय त्यांनी आपले आईवडील व मित्र परिवाराला दिले.सदर यश संपादन करण्यास ॲड .श्रीनिवास गवस व ॲड .वैभव चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.सहाय्यक सरकारी अभियोक्ता या पदी ॲड .आरती पवार यांची निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.