Selection of Dr. Chandrakant Sawant for the program ‘Beyond Thoughts’ on Sahyadri channel
ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा मठ प्राथमिक शाळा नं. २ चे पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत तुकाराम सावंत यांनी गेल्या २५ वर्षात समाज हितासाठी लाखो रुपये खर्च करून केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्याची दूरदर्शनने दखल घेतली असून आपल्या सह्याद्री वाहिनीवरील ‘विचारांच्या पलीकडले’ या कार्यक्रमासाठी डॉ चंद्रकांत सावंत यांची निवड केली आहे. मंगळवारी १० जानेवारी रोजी दुपारी २ वाजता डॉ चंद्रकांत सावंत यांची ‘विचारांच्या पलीकडले’ या कार्यक्रमासाठी मुलाखत घेण्यात येणार आहे. याबाबत दूरदर्शनच्या मुंबई केंद्राचे कार्यकारी भाषा संवादक विजय ढगे यांनी डॉ चंद्रकांत सावंत यांना पत्राद्वारे कळविले आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून लवकरच या कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार आहे.
ओटवणे प्रतिनिधी