वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द गावचा उदयोन्मुख मल्ल शुभम पंडित पाटील यांची दुसऱया नागा कुस्ती चॅमिपयनशिप स्पर्धेसाठी 74 किलो वजनी गटातून निवड झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नागालँड येथे भारतीय कुस्ती महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर कुस्त्या 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत संपन्न होणार आहेत.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शुभम सोमवार दि. 31 रोजी नागालँडला रवाना होणार आहे. पै. शुभम याने यापूर्वी कर्नाटक चॅम्पियन स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. तसेच राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्येही त्याने उल्लेखनीय बाजी मारली आहे.
शुभम याला ऑलिम्पिकपटू पै. एम. आर. पाटील, पै. कृष्णा पाटील, पै. काशिराम पाटील, पै. मोनेश्वर पाटीलसह आई, वडिलांचे व ग्रामस्थांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे.