वार्ताहर /किणये
शिक्षण खाते व क्रीडा विभागाच्यावतीने जिल्हा क्रीडांगणावर घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत द. म. शिक्षण मंडळ संचलित मंडोळी हायस्कूलचा विद्यार्थी वैभव जोतिबा आंबेवाडीकर याने पोल व्हॉल्टमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. त्याची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आरती बाबू आवडणकर हिने उंच उडीमध्ये तृतीय क्रमांक मिळविला. क्रीडा शिक्षक एस. एन. बेळगुंदकर, मुख्याध्यापक जी. पी. मिसाळे व सहशिक्षकांचे त्यांना मार्गदर्शन लाभले आहे.