जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
बेळगाव : बेळगावात ग्राहक आयुक्त खंडपीठाला मंजुरी दिली, मात्र इमारत नसल्यामुळे या ठिकाणी हे आयुक्त खंडपीठ सुरू करण्यास विलंब होत आहे. बीएसएनएलचे कार्यालय देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सरकारने त्या ठिकाणी ग्राहक आयुक्त खंडपीठ सुरू करावे, या मागणीसाठी अहिंद वकील संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. येथील जिल्हा ग्राहक न्यायालयाने निकाल दिल्यानंतर अपील करण्यासाठी थेट बेंगळूरला जावे लागत आहे. बेंगळूर येथील ग्राहक न्यायालयदेखील माहीत नाही, अशा ग्राहकांना त्याचा फटका बसत असून तातडीने ग्राहक न्यायालय सुरू करावे, अशी मागणी केली आहे. यावेळी अॅड. एन. आर. लातूर, अॅड. बाळकृष्ण कांबळे, अॅड. के. के. यादगुड, अॅड. शशिकांत कांबळे, अॅड. विनोद पाटील, अॅड. चेतन हेडगे, अॅड. संजय कुंचनारे, अॅड. एस. जी. उगारे, अॅड. निंगाप्पा मस्ती, अॅड. अनिल शिंदे, अॅड. विठ्ठल लमाणी, अॅड. आर. आर. चलवादी, अॅड. दऱ्याप्पा बिळगी, अॅड. नारायण इरणगी, अॅड. कुमार कांबळे, अॅड. रुपेश लातूर, अॅड. नामदेव मोरे यांच्यासह वकील उपस्थित होते.