ऑनलाईन टीम/ तरुण भारत
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज शपथविधी घेणार आहेत. मुख्यमंत्री पदाचे नाव देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाहीर करताच राज्यभरात शिंदे समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकनाथ शिंदे यांचे ट्विट करत अभिनंदन केले आहे. एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा- फडणवीसांचा मोठेपणा त्यांनी मला संधी दिली- एकनाथ शिंदेंनी मानले भाजपाचे आभार
काय म्हणाले शरद पवार
एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो. स्व. यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे असेही ते म्हणाले आहेत.