मुंबई
भारतीय शेअर बाजारात मंगळवारी आरबीएल बँकेचा समभाग 5.19 टक्के इतका वाढत 103 रुपयांवर पोहचला होता. याआधी हा समभाग 98.25 रुपयांवर बंद झाला होता. बँकेला 3 हजार कोटी रुपयांची उभारणी करायची असून यासंबंधी संचालक मंडळाने उभारणीला हिरवा कंदील दाखवल्याचे कळते. परिणामी कंपनीचा समभाग तेजी राखताना दिसला.