हिंदी सीरिजमधून झळकणार आयेशा अन् नेहा
अनेक कलाकार स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाहीरपणे बोलणे पसंत करत नाहीत. परंतु काही जणांचा यावर आक्षेप नतसो. ‘तुम बिन 2’, ‘मुबारका’ चित्रपटांमध्ये दिसून येणारी अभिनेत्री नेहा शर्मा आणि ‘सत्यमेव जयते’त दिसून आलेली तिची बहिण आयेशा शर्मा यांच्या जीवनावर आधारित रियलिटी शो ‘शायनिंग विथ द शर्माज’ डिजिटल प्लॅटफॉर्म सोशल स्वॅगवर स्ट्रीम होणार आहे.
शोसाठी होकार देण्यास मला फारवेळ विचार करावा लागला नाही. आयशासोबत काम करताना आम्ही घरातच आहोत असे वाटते. आम्ही दररोज काय करतो, आमची लाइफस्टाइल कशी आहे हे यात दाखविण्यात आले आहे. आम्ही आमची वैयक्तिक बाजू प्रेक्षकांना दाखविणार आहोत असे नेहाने म्हटले आहे. शोचे सौंदर्य हे आमचे नाते आहे. नेहाच्या जागी दुसरी कुणी असती तर मला विचार करावा लागला असतो. हा शो करण्यास मला खूप मजा आल्याचे आयेशाने सांगितले आहे.
या शोला अमेरिकन शो ‘कीपिंग अप विथ द कार्दशियन्स’सारखा ठरविण्यात येत आहे. परंतु नेहाने हा दावा फेटाळला आहे. कीपिंग अप विथ द कार्दशियन्स हा देखील रियलिटी शो असल्याने तुलना हाहेता. तो अत्यंत लोकप्रिय शो आहे. परंतु आमचा शो त्याच्यापेक्षा वेगळा असल्याचा दावा नेहाने केला आहे. आमच्या शोची पटकथा लिहिलेली नाही, आम्ही एक नवा प्रकार सुरू केला असल्याचे आयेशाचे म्हणणे आहे.
नेहा आणि आयेशा यांना बॉलिवूडमध्ये अद्याप स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करता आलेले नाही. आयेशा ही बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जाते. तर नेहाला आतापर्यंत चित्रपटांद्वारे फारसे यश मिळालेले नाही.