स्वामी अच्युतानंद महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
पणजी : कायसूव बार्देश येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानात आज बुधवार दि. 15 रोजी ते बुधवार दि. 22 रोजीपर्यंत ब्रह्मीभूत परमहंस स्वामी अच्युतानंद महाराज यांची 84वी पुण्यतिथी व शिशिरोत्सव आणि सोमवार दि. 3 एप्रिल रोजी श्री सिद्धेश्वर पंचायतन दैवतांचा 31वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त आज बुधवार दि. 15 रोजी सकाळी 7 वा. श्री स्वामी अच्युतानंद महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून सांगली येथील आदिनाथ म्युझिकल बँन्जो पार्टी सिंगरसहित वादनासह गावातून भव्य मिरवणूक होईल. गुरूवार दि. 16 रोजी स्वामीजींची पुण्यतिथी साजरी होणार आहे. त्याप्रित्यर्थ सकाळी स्वामीजींची मूर्तीवर महाभिषेक, पूजा, आरती. दुपारी 2 वा. फळफळावळींची पावणी, त्यानंतर सायं. 4 वा. समराधना व रात्री भजन कार्यक्रम होईल.
प्रतिवर्षाप्रमाणे शिशिरोत्सवाप्रित्यर्थ श्री सिद्धेश्वर मंदिरात शुक्रवार दि. 17 रोजी रात्री 10 वा. दाभोलवाडेकरातर्फे सामाजिक तीन अंकी नाटक ‘तुच खरा अपराधी’, शनिवार दि. 18 रोजी रात्री 10 वा. हुडोवाडेकरांतर्फे विनोदी दोन अंकी कोंकणी नाटक ‘आता करपाचे कितें’, रविवार दि. 19 रोजी रात्री 10 वा. वळकर – झरकर वाडेकरांतर्फे तीन अंकी संगीत सामाजिक नाटक ‘एक पिंजरा काटेरी’, सोमवार दि. 20 रोजी रात्री 10 वा. बंदिरवाडेकरातर्फे धमाल विनोदी दोन अंकी कोंकणी नाटक ‘4 इडियट्स’, मंगळवार दि. 21 रोजी बादेवाडेकरातर्फे धमाल विनोदी दोन अंकी कोकणी नाटक ‘नाटकीस’ सादर होईल. बुधवार दि. 22 रोजी दुपारी 3वा धुलिवंदन होईल. श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे गुरूवार दि. 30 रोजी दुपारी 12 वा. एकनाथ गोवेकर यांच्या यजमानपदाखाली श्री रामजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दुपारी 1.30 वा. महाप्रसाद होईल. सोमवार दि. 3 एप्रिल रोजी श्री सिद्धेश्वर पंचायतन दैवतांचा 31वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे. सकाळी विविध धार्मिक विधी, आरती, तीर्थप्रसाद, दुपारी महानैवेद्य होईल. रात्री 8वा. दिवजखांब पूजा, मंदिराभोवती बँड वादनासह पालखी प्रदक्षिणा व सुवासिनींतर्फे दिवजोत्सव व त्यानंतर खामिणी कलामंडळ पाली सावईवेरे, फोंडानिर्मित व देवानंद शिरोडकर पुरस्कृत सुपरफास्ट कॉमेडी कोंकणी नाटक देडशाणे सादर होईल. तरी सर्वांनी उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.