7.5 कोटी झाले फॉलोअर्स
अभिनेत्री श्रद्धा कपूरने इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर अनेक दिग्गज अभिनेत्रींना मागे टाकले आहे. श्रद्धा कपूरचे इन्स्टाग्रामवर आता 7.5 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. तर कॅटरिना कैफचे इन्स्टाग्रामवर 6 कोटी 84 लाख फॉलोअर्स आहेत. आलिया भट्टचे 7 कोटी 24 लाख फॉलोअर्स आहेत. दीपिका पदूकोनाचे 6 कोटी 99 लाख फॉलोअर्स आहेत. अभिनेत्रींमध्ये प्रियांका चोप्रानंतर श्रद्धा कपूरची दुसऱया क्रमांकाची फॅन फॉलोइंग इन्स्टाग्रामवर आहे.
श्रद्धा कपूरने हा टप्पा गाठल्यावर एक छायाचित्र शेअर केले आहे. यात तिने चहाचा कप हातात घेऊन हास्यमुद्रेत दिसून येते. ‘7.5 कोटी फॉलोअर्सचा आकडा सेलिब्रेट करत आहे, मोठमोठी इन्स्टा फॅमिली, छोटय़ातला छोटा आनंद’ असे तिने पोस्टमध्ये नमूद पेले आहे. श्रद्धा कपूरच्या या कामगिरीवर कियारा अडवाणी, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांनी तिचे अभिनंदन केले आहे. श्रद्धा कपूर ही सोशल मीडियावर खूपच सक्रीय आहे.
श्रद्धा लवकरच ‘स्त्राr 2’ या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव हा अभिनेता काम करत आहे. ‘स्त्राr’ हा चित्रट गाजला होता. याचबरोबर भेडिया या चित्रपटात तिने वरुण धवनसाब्sात एका गाण्याचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. तसेच लव रंजन यांच्या चित्रपटात श्रद्धा ही रणवीर कपूरसोबत दिसून येणार आहे.