रोबोट हे मानवी संस्कृतीच्या भविष्याचा हिस्सा ठरणार आहेत. रोबोटमध्ये अनेक प्रकारची मानवी गुणधर्म जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रोबोट बोलू अन् ऐकू शकतात. एवढेच नव्हे तर मानवी हावभाव समजण्याची क्षमताही विकसित होतेय. नव्या पिढीच्या मानवांसारख्या संवेदनायुक्त स्मार्ट रोबोट विकसित करण्यासाठी वेज्ञानिकांनी एक नव्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक त्वचा विकसित केली आहे. या ई-त्वचेत वेदना ओळखण्याची क्षमता आहे.
विशेष प्रकारचे तंत्र
ही विशेष त्वचा विकसित करण्याचे काम ग्लासगो विद्यापीठाच्या संशोधकांनी केले आहे. या त्वचेला त्यांनी कम्प्युटेशनल इलेक्ट्रॉनिक स्किन नाव दिले आहे. ही कृत्रिम त्वचा असून यात नव्या प्रकारचे प्रक्रियातंत्र बसविण्यात आले आहे. हे तंत्र सायनेप्टिक ट्रान्झिस्टर्सवर आधारित आहे.
त्वचेतच प्रतिक्रियेची क्षमता
या त्वचेत बाहेरील उत्तेजनांबद्दल प्रतिक्रिया शिकण्याची क्षमता असल्याचे या संशोधनात दर्शविण्यात आले आहे. या ई-त्वचेमुळे स्पर्शाची माहिती रोबोटला लवकर मिळविता येणार आहे. प्राध्यापक रविंद्र दाहिया यांच्या नेतृत्वाखाली बेंडेबल इलेक्ट्रॉनिक्स अँड सेंसिंसग टेक्नोलॉजीच्या (बीईएसटी) समुहाने मानवांमधील संवेदी पेशींप्रमाणेच ही त्वचा काम करावी अशा प्रारुपावर काम केले आहे.
तज्ञांनी झिंक ऑक्साइट नौनोवायरने तयार 168 सिनॅप्टिक ट्रान्झिस्टरचा ग्रिड तयार करत त्याला लवचिक प्लास्टिकच्या पृष्ठभागावर लावले आहे. त्यानंतर त्यांनी एका मानवी आकाराचा रोबोटिक हातात हा सिनॅप्टिक ट्रान्झिस्टर लावला, जेव्हा रोबोटिक हाताला काही स्पर्श होताच तो मागे जात होता. रोबोटची प्रतिक्रिया देखील उत्तेजनाच्या तीव्रतेवर निर्भर होती. संशोधनाचे हे पाऊल व्यापक स्तरावर न्यूरोमॉर्फिक प्रिंटेड इलेक्ट्रॉनिक स्किन तयार करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण असल्याचे प्राध्यापक दहिया यांनी म्हटले आहे.