प्रतिनिधी /फोडा
आडपई येथील तरंग समितीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या गुढी सजावट स्पर्धेत स्नेहल सागर नाईक मुळे यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. स्पर्धा आडपई गावापुती मर्यादित होती.
स्पर्धेचे द्वितीय पारितोषिक सूरज दिगंबर मागणी तर तृतीय प्रतिक्षा कृष्णा नाईक यांना मिळाले. साईनाथ नाईक, शिवानंद नाईक व सिद्धेश आडपईकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. आडपई गावचे सुपुत्र व केंद्रीय पर्यटनराज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याहस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी तरंग समितीचे अध्यक्ष सोमेश नाईक, तसेच प्रशांत नाईक, विठोबा नाईक, गौतम नाईक आदी उपस्थित होते. आडपई हे कलाकारांचे गांव असून येथील प्रत्येक सण उत्सवामध्ये कलाकारांच्या कलेचे दर्शन घडते. गुढीपाडव्याला घरासमोर उभारण्यात येणारी गुढी कशीप्रकारे कलात्मकरित्या सजविता येऊ शकते हे या स्पर्धेमुळे पाहायला मिळते, असे मंत्री श्रीपाद नाईक यावेळी बोलताना म्हणाले. पारंपरिक सणांचे औचित्य साधून गावातील कलाकारांना प्रोत्साहन देणारी अशी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्यांनी तरंग समितीचे अभिनंदन केले.