6 महिलांसह 28 जणांवर कारवाई-विदेशी दारू, डीजे म्युझिकल साऊंड सिस्टिमसह 14 लाख 46 हजाराचे साहित्य जप्त
प्रतिनिधी / सोलापूर
स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणच्या वतीने उत्तर सोलापूर तालुक्मयातील मौजे हागलुर येथील एम. ए. कॅपिटल रेस्टॉरंट अँड बार मधील बेकादेशीर चालणाऱया डान्सबार व ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी रविवार दिनांक 24 जुलै रोजी कारवाई केली आहे. या कारवाईत सहा महिलांसहित एकूण 28 जणांवर कारवाई केली असून विदेशी दारू, डीजे म्युझिकल साऊंड सिस्टिमसह एकूण 14 लाख 46 हजार 725 रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांचे पथक ऐवत धंद्यावर कारवाई करण्यासाठी तुळजापूर वरील मशरूम गणपती जवळ असताना त्यांना त्यांचे गोपनीय बातमीमार्फत माहिती मिळाली की, हगलूर (तालुका उत्तर सोलापूर) गावचे शिवारात हगलुर ते दहीहटणे जाणारे रोड लागत एम ए कॅपिटल रेस्टॉरंट अँड बार च्या आवारात हॉलमध्ये बेकदा विनापरवाना काही महिला अंगावर तोकडे कपडे घालून विविध हावभाव व अंगविक्षेप करून डीजे म्युझिक च्या तालावर अश्लील नृत्य करीत असल्याची माहिती मिळाली. याठिकाणी गुन्हे शाखेच्या ग्रामीणच्या टीमने पाहणी केली असता स्टेजवर सहा महिला अंगावर तुकडे कपडे घालून विविध हावभाव, अंगविक्षेप करून डीजेच्या म्युझिकच्या तालावर अश्लील नृत्य करीत होत्या. काही प्रेक्षक स्टेजकडील नर्तिकीकडे पाहून हावभाव करून संगीतेच्या तालावर नाचत असताना मिळून आले. चौकशी केल्या असता विनापरवाना हे ऑर्केस्ट्रा सुरू आहे. त्यामुळे या बारमधून डीजे म्युझिकल साऊंड सिस्टिम दोन कुलर, एक लॅपटॉप, लाईट सिस्टीम, विदेशी दारूचे क्वाटर व बिअरचा साठा तसेच 15 मोटर्स असा एकूण 14 लाख 46 हजार 725 किमतीचे साहित्य जप्त करून सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे, अनिल सनगल्ले, शिवकुमार जाधव, पोलीस अंमलदार संदीप काशीद, श्रीकांत गायकवाड, बापू शिंदे, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, आबासाहेब मुंडे, मोहन मनसावाले, लालसिंग राठोड, अक्षय दळवी,अजय वाघमारे, चालक समीर शेख, प्रमोद माने, महिला अनिसा पटेल, सुनंदा झळके, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे हवेल जाधव, शिवाजी मोरे यांनी बजावली आहे.