दौडमध्ये युवक-युवतांची लक्षणीय उपस्थिती : विद्यानगर, स्टेशनरोड, दुर्गानगर येथे दौडचे भव्य स्वागत
प्रतिनिधी /खानापूर
खानापूरच्या शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्यावतीने सुरु असलेल्या दुर्गा दौडीला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दररोज धारकऱयांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. जागोजागी दौडचे शाही पद्धतीने स्वागत करण्यात येत आहे.
येथील शिवस्मारक आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची भू-विकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, युवा कार्यकर्ते सचिन साळगावकर यांच्या हस्ते अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर नियोजित मार्गावरुन दौड मार्गस्थ झाली. महामार्गावरुन विद्यानगर येथे दौड आली. या ठिकाणी नवदुर्गा नवरात्री उत्सव मंडळाच्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर स्टेशन रोड, मुरगोड प्लॉट, मिशन कंपाऊंड येथून दौडचा दुर्गानगरात दाखल झाली. या ठिकाणी दौडचे स्वागत फुलांची उधळण, भगव्या कमानी, तोरण तसेच रांगोळय़ा घालून करण्यात आले. सुवासिनींनी औक्षण केले. फटाक्मयांची आतषबाजीही करण्यात आली. त्यानंतर दौडचे वाजपेयीनगर येथे आगमन झाले. त्या ठिकाणी स्वागत झाल्यानंतर दौड पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या दुर्गादेवी मंदिरात पोहोचली. येथे मंत्रोच्चारात पूजा होऊन दौडची आरती व प्रेरणामंत्राने सांगता झाली.
दौडमध्ये युवक-युवतींची तसेच महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रामुख्याने युवा वर्गामध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे दौडमध्ये सहभागी होणाऱयांची संख्याही वाढत आहे.
आजचा मार्ग
शिवस्मारक, न्यू निंगापूर गल्ली, नागलिंगनगर, श्री लक्ष्मी नारायण मंदिर, घोडे गल्ली, श्री स्वामी समर्थ केंद्र, श्री दत्त मंदिर, अर्बन बँक श्री दुर्गादेवी, भट गल्ली, जुना मोटर स्टँड रोड, बालाजी मंदिर, रविवार पेठ, श्री लक्ष्मी गदगा, धौराशी गल्ली, श्री चौराशीदेवी मंदिर सांगता.
उद्याचा मार्ग
रविवार दि. 2 रोजी शिवस्मारक, बुरुड गल्ली, केंचापूर गल्ली, श्री चौराशीदेवी मंदिर, पारिश्वाड क्रॉस, दादोबानगर, फुलेवाडी, मुडेवाडी, हत्तरगुंजी श्री चव्हाटा मंदिराकडे सांगता.