बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ झेंडाचौक व बेळगाव जिल्हा शरीरसौष्टव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 18 व्या श्री गणेश जिल्हास्तरीय शरीरसौष्टव स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला.
रामनाथ मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सुहास शिरोडकर, मयुरेश शिरोडकर, निवृत्त कॅप्टन प्रकाश नागरडोळेकर, स्वाती गौरांग गेंजी, सोनल बिर्जे, सुनिल जाधव, प्रवीण पाटील, राजकुमार खटावकर, अर्जुनसिंग रजपूत, सुनिल मुरकुटे, राजु मोरे, शाम बकुलकर, हेमंत हावळ, गिरीष धोंगडी, राजु मोरे अजित सिद्दण्णावर, मि. इंडिया सुनिल आपटेकर, हेमंत हावळ, जे. निळकंठ, जे. डी. भट्ट, शरीफ मुल्ला, उमा महेश आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
गणेश मूर्तीचे पूजन सुहास शिरोडकर व मयुरेश शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. हनुमान मूर्तीचे पूजन विजय जाधव यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन बसवराज विभूते व स्वाती गेंजी यांनी केले. तर लोकमान्य टिळकांच्या मूर्तीचे पूजन जे. डी. भट्ट व जे. निलकंठ यांनी केले.
ही स्पर्धा आयबीबीएफच्या नियमानुसार 55 किलो, 60 किलो, 65, 70, 75, 80 व 80 वरील गटात घेण्यात आल्या. जवळपास 150 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.