प्रतिनिधी / बेळगाव
दहावी परीक्षेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला असून गुऊवारी द्वितीय भाषा विषयाचा पेपर झाला. या पेपरला सुमारे 216 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. त्यामुळे अनेकांना परीक्षेचे गांभीर्यच नसल्याचे दिसून येत आहे.
द्वितीय भाषा विषयासाठी 31 हजार 611 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यामधील 31 हजार 415 जणच परीक्षेला बसले होते. तर उर्वरित 196 जण गैरहजर होते. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये परीक्षेला न बसणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. परीक्षेसाठी मागील महिन्याभरापासून विद्यार्थ्यांची तयारी सुरू होती.
चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 387 विद्यार्थ्यांची दांडी
दहावी परीक्षेच्या द्वितीय भाषा इंग्रजी पेपरला गुऊवारी चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात फ्रेशर असलेल्या 370 व रिपीटर 17 अशा एकूण 387 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. सर्व परीक्षा केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सीसी पॅमेऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या विविध पथकांच्या देखरेखीखाली कोणताही अनुचित प्रकार न घडता तिसरा पेपर सुरळीत पार पडला.