State level meritorious principal award to Shubhangi Chavan
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कारासाठी माजगाव येथील श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शुभांगी हेमंत चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष जे के पाटील आणि सचिव शांताराम पोखरकर यांनी ही निवड केली आहे.
या पुरस्काराचे वितरण सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी अहमदनगर स्टेशन रोड येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात होणाऱ्या मुख्याध्यापक महामंडळाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
माजगाव शिक्षण सहाय्यक संस्थेचे अध्यक्ष भास्कर कासार सचिव सीए लक्ष्मण नाईक यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
ओटवणे / प्रतिनिधी