3 ऑगस्टपासून करणार रुग्णसेवेला प्रारंभ : रुग्णांना होणार लाभ
बेळगाव : आरोग्यसेवेत असे फार कमी डॉक्टर आहेत की त्यांनी आपल्या अनुभवातून शेकडो रुग्णांना जीवदान दिले आहे. डॉ. वरदराज गोकाक हे त्यापैकीच एक असून ते एक अत्यंत कुशल आणि सक्षम डॉक्टर आहेत. डॉ. वरदराज गोकाक यांनी आपल्या उपचारातून रुग्णांवर होणारा उत्कृष्ट परिणाम नेहमी लक्षात ठेवणारा आहे. डॉ. वरदराज गोकाक हे आपल्या रुग्णांचे जीवन सुकर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देतात. आता डॉ. वरदराज गोकाक हे गुरुवार दि. 3 ऑगस्टपासून अरिहंत हॉस्पिटलमध्ये कार्यरत राहणार असून अरिहंत हॉस्पिटलच्या माध्यमातून ते रुग्णसेवा प्रदान करणार आहेत.
डॉ. वरदराज गोकाक हे गत 15 वर्षांपासून गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट म्हणून सेवा बजावत आहेत. आतडे, पोटाशी संबंधित रोग, यकृत रोग, एंडोस्कॉपी, स्वादुपिंडाचा दाह, कोलोनोस्कॉपी, ईआरसीपी, डायलेटेशन, एसोफेजियल / कॉलोनिक स्टेंटिंग यांसारख्या विकार असलेल्या रुग्णांना दर्जेदार उपचार प्रदान करण्यात ते अग्रणी असून हेपेटायटीस बी व सी रुग्णांना उपचार देण्यात त्यांचा हातखंडा आहे.
डॉ. वरदराज गोकाक यांनी बेळगाव येथील जेएनएमसी महाविद्यालयातून एमबीबीएस, एमडी पदवी मिळविली आहे.
डीएनबी (मेडिकल गॅस्ट्रो) ही पदवी एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, हैदराबाद, तर
जनरल मेडिसिन एमडी (गोल्ड मेडालिस्ट) ही पदवी बेंगळूरु येथील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथून मिळविली आहे. डॉ. वरदराज गोकाक हे इंडियन सोसायटी ऑफ गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजीचे सदस्य आहेत. त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या यकृत रोग असलेल्या रुग्णांवर अनेक शोधनिबंधही लिहिले आहेत.