न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी मळगाव रेल्वे स्टेशनवर मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून प्रवाशांच्या ठेवलेल्या बॅगा विस्कटणे , प्रवाशांच्या अंगावर जाणे आदी प्रकार वाढीस लागल्याने प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे.तरी रेल्वे प्रशासनाने याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
सध्या सर्वत्र सर्व ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.मळगाव रेल्वे स्टेशनवर जवळपास पन्नासच्या आसपास मोकाट कुत्रे आहेत. हे मोकाट कुत्रे आपल्याला खाद्य मिळावे यासाठी इतरत्र भटकत असतात.प्रवाशांनी ठेवलेल्या बॅगातही ते आपल्याला खाण्याजोगे काही मिळेल काय म्हणून तोंड घालतात.प्रसंगी प्रवाशांच्या अंगावर येतात त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तरी या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.