वरचा बाजार फोंडा येथील घटना
प्रतिनिधी /फोंडा
परीक्षेचा निकालावरून मानसिक तणावाखाली असलेल्या एका विद्यार्थीनीने वरचा बाजार फोंडा येथील मलिटा अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याचा प्रकार काल सोमवारी दुपारी उघडकीस आला. नाझिया खुरहिद शेख (बोंडबाग-बेतोडा) असे तिचे नाव आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाझिया ही फर्मागुडी-फोंडा येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावीच्या वर्गात शिकत होती. मागील काही दिवसापासून ती परीक्षेच्या कारणावरून मानसिक तणावाखाली होती. पाच दिवसापुर्वी हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. काल सोमवारी ती वरचा बाजार फोंडा येथील मलिटा अपार्टमेंट येथे आपल्या अंकलच्या घरी आली होती. तेव्हाच तीने हे कृत्य केले. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. सदर घटनेचा अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून उपनिरीक्षक नितेश काणकोणकर अधिक तपास करीत आहे.