क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कोप्पळ येथे कर्नाटक अमॅच्युअर सिलम्बम संघटना आयोजित अब्दुल रजाक टेलर यांच्यावतीने करिसिध्देश्वर भवन येथे घेण्यात आलेल्या सहाव्या राज्यस्तरीय सिलम्बम स्पर्धेत बेळगाव जिल्हय़ाच्या सिलम्बम संघाने यश संपादन केले. सदर स्पर्धेत 250 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
बेंगळूर ग्रामीण, म्हैसूर, चिक्कबळ्ळापूर, रामनगर, मंगळूर, धारवाड, चिक्कमंगळूर, बिदर, कोलार, कोप्पळ व बेळगाव आदी जिह्यांतील खेळाडूंनी भाग घेतला होता.
लाठीफाईटमध्ये 50 किलो वजनी गटात बेळगावच्या मृणाल लोहार व राधिका मल्लवगोळने 35 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले. एकेरी लाठी स्पर्धेत मृणाल लोहार व राधिका मल्लवगोळ यांनी सुवर्णपदक पटकाविले. त्यांना प्रशिक्षक लक्ष्मण नाईक, सचिता सांबरेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.