क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 38 व्या राज्य रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी 14 सुवर्ण, 9 रौप्य 12 कांस्य अशी एकूण 35 पदके मिळवित घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत जवळपास 800 स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता.
स्पीड स्केटिंग- आराध्या पी. – 3 सुवर्णपदक, प्रांजल पाटील – 1 रौप्य, 1 कास्य, आर्या कदम – 1 रौप्य, 1 कास्य, जान्हवी तेंडुलकर – 1 रौप्य, आराध्या मोरे – 1 रौप्य, 2 कास्य, अपेक्षा नवलाई – 1 कांस्य, श्री रोकडे – 1 कास्य, अवनीश कामन्नवर-1 कांस्य, सौरभ साळोखे 1 कास्य, जियान आली तांबोळी 1 कास्य, साक्षी रामणकट्टी 1 कास्य.
फ्रीस्टाईल स्केटिंग- अवनीश कोरीशेट्टी – 2 सुवर्ण, श्रीयांश नामगौडर – 1 रौप्य, जयध्यान राज 1 सुवर्ण, 1 रौप्य, रश्मिता अंबिगा – 2 सुवर्ण, देवेन बामणे – 1 सुवर्ण, 1 रौप्य, तुलसी हिंडलगेकर-1 रौप्य, प्रिती नवले 1 कास्य, अभिषेक नवले 1 सुवर्ण, भरत पाटील – 1 रौप्य 1 कांस्य.
अल्पाइन आणि डाउनहिल स्केटिंग- साईराज मेंडके -2 सुवर्ण, अमेय याळगी – 1 सुवर्ण, शुभम साखे -1 सुवर्ण.
या सर्वांना स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विशाल वेस्ने विठ्ठल गगणे, गणेश, सक्षम जाधव, सोहम हिंडलगेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.