केएलई इस्पितळातील तिसरी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया
प्रतिनिधी /बेळगाव
गोवा येथील एका युवकावर हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी करून त्याला जीवनदान देण्यात आले. येथील केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या इस्पितळातील ही तिसरी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे.
हृदया संबंधीच्या दीर्घकालीन आजाराने त्रस्त असणाऱया गोवा येथील एका युवकाने 2018 मध्ये हृदयप्रत्यारोपणासाठी आपले नाव नोंदविले होते. तेंव्हापासून आतापर्यंत यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र दात्यांचे हृदय रुग्णाच्या हृदयाशी जुळत नव्हते. त्यामुळे ही शस्त्रक्रिया लांबणीवर पडली होती.
डोक्मयाला जबर दुखापत झाल्यामुळे उपचारासाठी इस्पितळात दाखल झालेल्या बेळगाव येथील एका रुग्णाचा ब्रेनडेड झाला होता. त्याच्या कुटुंबीयांशी चर्चा करून डॉक्टरांनी हृदयदानासाठी त्यांची सहमती मिळविली व गोवा येथील युवकावर हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. हॉस्पिटलचे मुख्य हृदयरोग तज्ञ डॉ. रिचर्ड सालढाणा व त्यांच्या सहकाऱयांनी ही शस्त्रक्रिया केली. याबद्दल केएलई संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.