वृत्तसंस्था / भुवनेश्वर
भारताने बुधवारी एक महत्त्वपूर्ण पावलाच्या अंतर्गत ओडिशाच्या किनाऱयावरून दुसऱया टप्प्यातील बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ‘इंटरसेप्टर’ एडी-1 च्या पहिल्या उड्डाणाचे यशस्वी परीक्षण केले आहे. विविध स्थानांवर सिथत सर्व बॅलेस्टिक क्षेपणास्त्र रक्षण (बीएमडी) शस्त्रास्त्र प्रणालीच्या भागीदारीसह एडी-1 क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण करण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने बुधवारी ओडिशाच्या किनाऱयावर एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हे परीक्षण केले आहे. एडी-1 हे दीर्घ पल्ल्याचे ‘इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्र असून ते दीर्घ पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रासह विमानाला रोखण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. ही बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली स्वदेशी नियंत्रण यंत्रणा, नेव्हिगेशन आणि मार्गदर्शक एल्गोरिदमने युक्त आहे. या क्षेपणास्त्र प्रणालीच्या सर्व उपप्रणालींनी उड्डाण परीक्षणादरम्यान अपेक्षित कामगिरी केली आहे. रडार, टेलिमेट्री आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रकिंग स्टेशन्सह अनेक रेंज सेंसरकडून प्राप्त डाटाद्वारे याला नियंत्रित करण्यात आल्याचे डीआरडीओकडून सांगण्यात आले.
यापूर्वी 21 ऑक्टोबर रोजी ‘अग्नि प्राइम’ क्षेपणास्त्राचे तिसऱयांदा यशस्वी परीक्षण करण्यात आले हेते. अग्नि प्राइम हे नव्या पिढीचे मध्यम पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. तसेच ते पूर्णपणे स्वदेशी क्षेपणास्त्र आहे.