वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताने मंगळवारी रणगाडाविरोक्षी हेलिना क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. या क्षेपणास्त्राचे परीक्षण ऍडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टरद्वारे लडाखच्या उंचीवरील क्षेत्रामध्ये करण्यात आले. हे क्षेपणास्त्र फायर अँड फॉरगेटनुसार काम करते. हे क्षेपणास्त्र डागण्यात आल्यावर ते लक्ष्य हलले तरीही त्याला नष्ट करण्यास सक्षम आहे.
इन्फ्रारेड इमेजिंग सिस्टीमवर हे क्षेपणास्त्र काम करते. या परीक्षणादरम्यान या क्षेपणास्त्राने एक सिम्युलेटेड रणगाडय़ावर अचूक निशाणा साधला असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली.
यापूर्वी या क्षेपणास्त्राचे राजस्थानच्या पोखरण फायरिंग रेंजमध्ये यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. भारताकडे नाग नावाचे आणखी एक रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे. ही दोन्ही क्षेपणास्त्रs हेलिकॉप्टरद्वारे डागली जाऊ शकतात तसेच दोघांचाही मारक पल्ला 7 किलोमीटर आहे. डीआरडीओ, वायुदल आणि सैन्याने मिळून हे परीक्षण केले आहे.
हेलिना क्षेपणास्त्र कुठल्याही प्रकारच्या हवामानात डागले जाऊ शकते. हे क्षेपणास्त्र अंधारातही अचूक लक्ष्यभेद करण्यास सक्षम आहे. शत्रूच्या रणगाडय़ाला दोन प्रकारे लक्ष्य करण्याची यात क्षमता आहे. हे क्षेपणास्त्राला डायरेक्ट हिट करू शकते आणि टॉप अटॅक मोडमध्येच रणगाडय़ाला लक्ष्य करू शकते.