ओटवणे/ प्रतिनिधी-
ओटवणे कापईवाडी येथील अर्जुन यशवंत वरेकर (वय ३५ ) या युवकाचे आकस्मित निधन झाले. त्याच्या अकाली निधनाने वरेकर कुटुंबीयांसह सर्वांनाच धक्का बसला. गेले काही दिवस अर्जुन कावीळच्या आजाराने त्रस्त होता. उपचारानंतर तो बरा झाला होता. मात्र पुन्हा कावीळ झाल्याने प्रकृती औषध उपचारांना साथ देत नव्हते. त्यामुळे अखेर त्याचे निधन झाले. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच ओटवणे गावावर शोककळा पसरली. दुपारी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, एक भाऊ, बहिण, भावजय, पुतणे, पुतणी असा परिवार आहे. येथील झीलू वरेकर याचा तो भाऊ होत.