Suicide of a married woman in Kolgaon
शेतविहीरीत सापडला मृतदेह
कोलगाव मारुती मंदिर मागे काही अंतरावर असलेल्या शेतविहिरीत शनिवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला . तिची ओळख पटली असून ती कोलगाव -कुंभारवाडी येथील विवाहिता काजल राजन कुंभार ४२ असे तिचे नाव आहे . त्या शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून घरातून बेपत्ता होत्या . गेले काही दिवसांपासून तिची मानसिक स्थिती बिघडली होती . त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे .
सावंतवाडी / प्रतिनिधी