कर्ज मंजूरीचे बोगस पत्र दाखवून पैसे उकळले
मिरज प्रतिनिधी
बँकेकडून कर्ज मंजूर कऊन देण्याचे अमिष दाखवून बंटी बबलीच्या जोडीने बँक मॅनेजरीशी संगनमत कऊन तालुक्यातील सोनी येथे राहणाऱ्या सचिन पांडूरंग पाटील (वय 42) यांना नऊ लाख, 70 हजार ऊपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका बँक व्यवस्थापकासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माधुरी स्वप्नील शेडबाळे, स्वप्नील सुरगोंडा शेडबाळे (दोघे रा. पंचगंगा साखर कारखान्याजवळ, इचलकरंजी) या बंटी-बबलीसह एका बँकेचा व्यवस्थापक असलेला अमर नामक व्यक्ती अशा तिघांचा समावेश आहे. संबंधीत तिघांनी सचिन पाटील यांना कर्ज देण्याचे अमिष दाखवले. प्रक्रिया फी आणि कर्ज मंजूरीचे बोगस पत्र दाखवून पैसे घेतल्याचे तपासातून पुढे आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सचिन पाटील यांना बँकेकडून कर्ज हवे होते. यासाठी त्यांनी एका खासगी बँकेकडे कर्ज मागणी केली होती. सदर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माधुरी व स्वप्नील शेडबाळे यांनी बँक व्यवस्थापकाशी संगनमत कऊन पाटील यांना वेगवेगळे अमिष दाखवले. तुमचे कर्ज मंजूर होण्यासाठी लागणारी प्रोसेसिंग फी, बनावट आयटी रिटर्न, उद्योग आधार परवाना काढावा लागत असल्याचे सांगून पाच लाख, 70 हजार ऊपये घेतले. त्यानंतर कर्ज मंजूर झालेल्याचा बनावट धनादेश दाखवून त्या बदल्यात आणखीन चार लाख ऊपये घेतले. संबंधीतांनी आत्तापर्यंत नऊ लाख, 70 हजार ऊपये पाटील यांच्याकडे घेतले.
त्यानंतर आजतागायत कर्ज मंजूर झाले नाही. त्यामुळे पाटील यांनी दिलेल्या पैशांची परत मागणी केली. मात्र, संबंधीतांनी पैसे देण्यासही टाळाटाळ केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सचिन पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसात धांव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार बंटी-बबलीसह बँक व्यवस्थापकाविऊध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, बंटी-बबलीच्या या टोळीने कर्ज मंजूरीच्या अमिषाने अनेकांना गंडा घातल्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तिघेही पळून गेले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. संबंधीतांना गजाआड केल्यानंतर त्यांच्याकडून अनेक फसवणुकीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास सुरू आहे.