सातारा प्रतिनिधी
माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले यांचे उरमोडी धरणालगत एक फार्म हाऊस आहे. रीतसर परवानगी घेऊन हे फार्म हाऊस बांधण्यात आलेले आहे. परंतु माहिती अधिकार अधिकारी सुशांत मोरे यांनी हे बेकायदेशीर रित्या असल्याचे दावे सादर केलेले आहेत. याबाबतीत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर पुरावे सादर केलेले आहेत.राजु भोसले यांनी 2016 मध्ये तत्कालीन सातारा तहसीलदारांच्या परवानगीने फार्म हाऊस बांधले होते. 2021 मध्ये सातबारा उतारा वरून करण्याबाबतही अर्ज केलेला होता त्यानंतर 2022 मध्ये सातबारा उताऱ्यावर फॉर्म हाऊस बांधल्याची नोंद आहे.
त्याचप्रमाणे 2022 मध्ये तत्कालीन तहसीलदारांनी याप्रकरणी दहिवडी मंडलाधिकाऱ्यांचा अभिप्राय घेऊन बांधकामाची नोंद सातबारा उताराला करण्यास हरकत नसल्याचा अभिप्रय सादर केला आहे. सगळे बांधकाम हे परवानगी आणि कायदेशीर असतानाही राजकीय अक्सापोटी काही विरोधक सतत माझ्या विरोधात कारवाई करत आहेत असा राजूभैया भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अतिशय कष्टातून मी प्रगती केलेली आहे मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आमदार शिवेंद्र श्रीराजे भोसले यांचे नेतृत्व मानत परी भागात काम करत आहे या मागा माझे वर्चस्व वाढत असल्यामुळे मला बदनाम करण्याचे हेतूने समाजातील माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी सतत काही ना काही कुरबड्या सुरू आहेत.सुशांत मोरे यांचा अर्ज निकाली निघाल्या नसल्याने आता कुठेच काही होत नाही हे पाहून बदनामी करण्याच्या हेतूने त्यांनी नोटीस पाठवलेली आहे परंतु या प्रकरणात कायद्याचे उल्लंघन करून कोणतीही कृती केलेली नाही त्यामुळे कायदेशीर लढाईमध्ये माझाच विजय होईल याची मला खात्री आहे असे माझे जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले यांनी म्हटले आहे.