पाकी हलगेकरला चार सुवर्णपदके
बेळगाव : कोल्हापूर जिल्हा येथील कुरूकल्ली तालुका कुलव येथे झालेल्या निमंत्रितांच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व अॅक्वेरस जलतरण पट्टूाrनी 14 सुवर्ण, 26 रौप्य व 5 कास्यपदासह घवघवीत यश संपादन केले आहे. हलगेकरने 4 सुवर्णपदकांची लयलुट केली आहे. कुल्लूव जलतरण तलावात आयोजित करण्यात आलेल्या कुलव व हिंदवी कला क्रीडा मंडळ आयोजित महाराष्ट्र राज्य, कोल्हापूर जिल्हा अॅक्वेटिक संघटना यांच्या संयुक्तमद्याने आयोजित केलेल्या या जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर व अॅक्वेरस क्लबच्या पाकी हलगेकरने गट 6 मध्ये मुलींच्या विभागात 4 सुवर्णपदके, निधी कुलकर्णीने गट 4 मध्ये 2 सुवर्ण, 2 रौप्य, अनन्या पैने गट तीनमध्ये 1 सुवर्ण, 4 रौप्य, समीक्षा घसारीने गट 4 मध्ये 1 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कास्य पदक पटकाविले. मुलांमध्ये साथई शेखरने गट 4 मध्ये 1 सुवर्ण, 1 रौप्य. भगतसिंग गावडेने गट 6 मध्ये 1 सुवर्ण, 3 रौप्य, जिशांत भाटीने गट 6 मध्ये 1 सुवर्ण, 3 रौप्य, अथर्व राजगोळकरने गट 5 मध्ये 1 सुवर्ण, 1 रौप्य, 2 कास्यपदक, तनिष भाटीने गट 5 मध्ये सुवर्णपदक, विहान कोरीने गट 5 मध्ये 1 सुवर्ण, 1 रौप्य, अनिश पै ने गट 4 मध्ये 4 रौप्य, 1 कास्य, यशराज पावशेने 2 रौप्य, 1 कास्य तर गट चारमध्ये लावन्या हाधिमनी, मनीष काळे व नित्या पाटील यांनी रौप्यपदक पटकाविली. जलतरणपट्टूंना प्रशिक्षिक अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडचकर, गोवर्धन काकतीकर यांचे मार्गदर्शन तर अविनाश पोतदार, उमेश कलघटगी यांचे प्रोत्साहन लाभत आहे.