वृत्तसंस्था/ माद्रिद
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या माद्रिद खुल्या पुरूष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत महिलांच्या विभागात पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकने अमेरिकेच्या मॅडिसन किजचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात स्वायटेकने 70 मिनिटांच्या कालावधीत मॅडिसन किजचा 6-1, 6-3 असा फडशा पाडला. आता द्वितीय मानांकित साबालेंका व चौथी मानांकित रिबाकेना यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना होणार असून या सामन्यातून विजयी खेळाडू बरोबर स्वायटेकची जेतेपदासाठी लढत होईल.