वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील काही दिवसांपासून वाहन क्षेत्राची स्थिती बदलत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यामध्ये कंपन्यांनी रचनेत बदल करत अत्याधुनिक मॉडेल्स बाजारात आणल्या आहेत. पर्यावरणाचे संवर्धन होण्यासोबतच कार्बन उत्सर्जनावर कंपन्या काम करत आहेत. ग्राहकांची स्कूटर खरेदीची बदलती मानसिकता व नवी संकल्पना यासह सर्वाधिक विक्री करण्यात आलेल्या कंपन्यांच्या स्कूटरची माहिती आपण जाणून घेऊया.
मे महिन्यात होंडा या कंपनीने सर्वाधिक स्कूटर्स विकल्या आहेत. 10 सर्वाधिक वाहनांची विक्रीमध्ये होंडाची ऍक्टिव्हा अव्वल स्थानी राहिली आहे. मे मध्ये ऍक्टिव्हाची 1,49,407 युनिट विक्री झाली. तसेच टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर व सुझुकी कंपनीची ऍक्सेस दुसऱया व तिसऱया स्थानी राहिली आहे. यामध्ये जादा विक्री होणाऱया स्कूटरमध्ये फक्त एक इलेक्ट्रिक स्कूटर ओलाची एस1 प्रो 9 व्या स्थानावर राहिली आहे. या स्पर्धेत अन्य कंपन्यांची कामगिरी पुढीलप्रमाणे.
टीव्हीएस ज्युपिटर
टीव्हीएसने मे मध्ये 59,613 युनिट्स इतक्या ज्युपिटरच्या स्कूटर्स विकल्या आहेत. सर्वाधिक विक्री होणाऱया स्कूटरमध्ये ज्युपिटर दुसऱया नंबरवर राहिली आहे. एप्रिलच्या तुलनेत विक्रीत काहीशी घसरण राहिली आहे.
सुझुकी ऍक्सेस
सुझुकी ऍक्सेस विक्रीत तिसऱया स्थानावर राहिली आहे. सुझुकीने मे मध्ये ऍक्सेसच्या 35,709 युनिटची विक्री केली आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मेमध्ये ऍक्सेस विक्रीत 8.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये सुझुकीच्या ऍक्सेसची 32,932 युनिट विक्री राहिली होती.
टीव्हीएस एन टॉर्क
मागील महिन्यात टीव्हीएस एन टॉर्कच्या 26,005 युनिटची विक्री झाली आहे. हा आकडा मे महिन्यातील सर्वाधिक विक्री करणाऱया कंपन्यांच्या स्पर्धेत चौथी स्कूटर राहिली आहे. एप्रिलच्या तुलनेत मे मध्ये एन टॉर्कची विक्री वाढत राहिली आहे.
होंडा डियो
होंडाचे आणखीन एक मॉडेल ‘डियो’ हे पहिल्या 10 मध्ये समाविष्ट झाले आहे. मे मध्ये होंडाने डियोच्या 20,487 इतक्या युनिटची विक्री केली. याची तुलना जर एप्रिलच्या तुलनेमध्ये डियोची विक्री सर्वाधिक राहिली आहे.
हिरो प्लेजर
मे महिन्यात स्कूटर विक्रीत हिरोची प्लेजर ही सहाव्या नंबरवर राहिली. हिरोने मे मध्ये प्लेजरच्या 18,531 युनिटची विक्री केली आहे.
होंडा ऍक्टिव्हा
होंडा ऍक्टिव्हा मे महिन्यात सर्वाधिक विक्री झालेली स्कूटर आहे. यामध्ये मे मध्ये ऍक्टिव्हाची 1,49,407 युनिट विक्री झाली आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात विक्री कमी राहिली परंतु पुन्हा एकदा सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर ठरली आहे. एप्रिलमध्ये ऍक्टिव्हाची 1,63,357 युनिट विक्री झाली होती.
सुझुकी बर्गमन स्ट्रीट
एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे मध्ये सुझुकी बर्गमन स्ट्रीटची विक्री ही 43 टक्क्यांनी वधारली आहे. सुझुकीने एप्रिलमध्ये फक्त 9,088 इतकी विक्री केली आहे. हाच आकडा मे मध्ये वधारुन 12,990 इतक्या टप्प्यावर पोहोचला आहे. यामध्ये स्कूटरच्या विक्रीत 7 वे स्थान प्राप्त केले आहे.
हिरो डेस्टिनी
हिरोने मे महिन्यात डेस्टिनीच्या 10,892 युनिटची विक्री केली आहे. मे मध्ये स्कूटरच्या विक्रीत हिरो डेस्टिनी 8 नंबरसोबत तेजीत राहिली आहे.
ओला एस1 प्रो
मे महिन्यात स्कूटरची विक्री पहिल्या 10 मध्ये राहिली असून यामध्ये फक्त एक इलेक्ट्रिक स्कूटर असण्याचा मान तिला आहे. ओला एस1 प्रोने विक्रीत 9 वे स्थान प्राप्त करत पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवले आहे. ही स्कूटर देशातील सर्वाधिक विक्रीत राहिलेले मॉडेल झाले आहे.
सुझुकी एव्हिनिस
सुझुकीने मेमध्ये एव्हिनिसच्या 8,922 युनिटची विक्री केली आहे. मेमध्ये याच्या विक्रीत काहीशी घसरण झाली होती. हिरोने एप्रिलमध्ये एव्हिनिसच्या 11,078 इतक्या युनिटची विक्री झाल्याची नोंद आहे.