सांखळी/प्रतिनिधी
गोवा कला आणि संस्कृती व पर्यटन खाते आयोजित राज्य उत्सव त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त नौकानयन स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम बुधवारी सांखळी रवींद्र भवनात पार पडला. कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना बक्षीस प्रदान करण्यात आली.
यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, सांखळी रवींद्र भवनचे उपाध्यक्ष विठोबा घाडी, शैलेंद्र फातर्पेकर, सगुण वेळीप, नारायण सावंत, सरपंच दत्तप्रसाद खरकांडे, अशोक परब, सिद्धार्थ गायतोंडे यांची उपस्थिती होती.
विठ्ठलापुरला अधिक झळाळी देऊ : मंत्री गावडे
त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने सांखळी विठ्ठलापूर येथील विठ्ठल मंदिर आणि पर्यटन स्थळाला नवीन झळाळी देण्यासाठी सरकार विचाराधीन असून येथे होणाऱया नौकानयन स्पर्धेतील बक्षीसांत यापुढे वाढ करून ते पन्नास हजार केले जाईल. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱया प्रत्येकाला मानधन देण्यात येईल. मात्र स्पर्धा आयोजित करताना पर्यावरणाचा विचारही व्हायला हवा, असे मत गोवा कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केले. आमदार प्रेमेंद्र शेट, सरपंच खरकांडे, फातर्पेकर, सावंत यांनी आपले विचार मांडले.
या स्पर्धेत दुसरे बक्षीस कलियुगी बॉईस कारापूर, तिसरे बक्षीस भूमी बॉईस पर्ये, चौथे बक्षीस यन्सी ग्रुप विठ्ठलापूर, पाचवे बक्षीस ओवरलोक पर्ये, उतेजनार्थ बक्षीस सारंग होंडा सत्तरी, भुतनात बॉईस आमोणा, सिक्स ब्रदर्स पर्ये, त्रिपुरातक विठ्ठलापूर, युनिक बॉईस पर्ये आणि उत्कृष्ट कला सादरीकरण अथर्व टेन पर्ये, शिवाजी गडेकर-पेडणे, श्रेयश गडेकर-पर्ये, धीरज साळगावकर-शिवनेरी, जय भवानी-पर्यें, राजवाडा बॉईस विठ्ठलापूर, जलयान विठ्ठलापूर, टेड आईस आमोणा, समपुरूष डिचोली, डेट डेवील विठ्ठलापूर या सर्वांना रोख रक्कम आणि प्रथम विजेत्यांना सरकार तर्फे फिरता चषक देण्यात आला. सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले.