नवी दिल्ली
देशातील वाहन निर्मिती कंपनी टाटा मोर्ट्स यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरी परिवहन सेवा देण्यासाठी लिथियम अर्बन टेक्नॉलॉजीसोबत इलेक्ट्रिक कारचा पुरवठा करण्यासाठी करार करण्यात आला आहे.
या व्यवहाराअंतर्गत लिथियम अर्बन कर्मचाऱयांच्या परिवहनसाठी देशभरात 5,000 एक्सप्रेस-टी इलेक्ट्रिक कार देण्यात येणार आहेत. टाटा आगामी काळात काही टप्प्यांमध्ये या इलेक्ट्रिक वाहनांचा पुरवठा करणार असून आगामी वर्षापर्यंत हा टप्पा पूर्ण करण्याची योजना आखण्यात येणार आहे. टाटा मोर्ट्स प्रवासी वाहनांचे संचालक शैलेश चंद्रा यावेळी म्हटले आहे, की सदरचा करार सध्याच्या इलेक्ट्रिक कार्सच्या युगात अतिशय महत्त्वाचा ठरणारा आहे. दोघांनाही एकत्रित या क्षेत्रात गती घेण्यासाठी मोठी संधी असणार आहे. आगामी काळात आम्ही लिथियम अर्बन टेक्नॉलॉजीसोबत दीर्घकालावधीसाठी करार केला असल्याचेही चंद्रा म्हणाले.