वार्ताहर /पालये
मांद्रे येथील रमाकांत खलप विद्यालयात शिक्षक उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची रूपरेषा ज्ये÷ शिक्षक शरद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आखण्यात आली होती व कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षिका बेला फर्नांडिस, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक शरद गावडे, मुख्याध्यापक मोहनदास चोडणकर यांची उपस्थिती होती.
बाळकृष्ण सावंत या विद्यार्थ्याने मुख्याध्यापकपदाची जबाबदारी पेलली. कार्यक्रमाची सुरुवात गायनाने झाली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.विद्यार्थ्यांनी नृत्य, कविता सादर करून भाषणातून शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्गात जाऊन आपली शिक्षकाची भूमिका चांगल्या प्रकारे वठवली. मान्यवरांची भाषणे झाली. इयत्ता दहावीची विद्यार्थिनी सेजल कोरगावकर हिने प्रास्ताविक, आर्या जठार हिने सूत्रसंचालन केले. योगीता पेडणेकर हिने मान्यवरांची ओळख करून दिली. कु.स्वरा म्हामल हिने आभार मानले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.