एका घटस्फोटाच्या खटल्याची सुनावणी करताना, कर्नाटक उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. एखाद्या व्यक्तीच्या काळ्या रंगावर टिप्पणी करणे म्हणजे वांशिक टिप्पणी असून ती क्रुरता ठरवण्यात येईल. बंगळूर येथील कौटुंबिक न्यायालयाने एक प्रकरणात पत्नीने पतीला त्याच्या काळ्या रंगावरून शेरेबाजी केली होती तसेच पतीला कायम अपमानित केले असल्याचेही सांगितले. त्यानंतर पतीने पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केल्यानंतर हा घटस्फोट नामंजूर करण्यात आला होता.
यावेळी निकाल देताना खंडपीठाने म्हटले आहे कि, पत्नीने पतीचा केलेला अपमान लपवण्यासाठी पत्नीने पतीवर अनैतिक संबंधाचा आरोप ठेवला होता. त्यामुळे ही खुपच क्रूरता असून कनिष्ठ न्यायालयाचा घटस्फोट न देण्याचा आदेश रद्दबातल ठरवला जात आहे, असेही हायकोर्टाने अधोरेखित केले. तसेच एखाद्याला काळ्या रंगावरून अपमानित करणे हे त्याच्यावर वांशिक टिप्पणी केल्याचे मानले जाईल. असा निर्णय दिला आहे.
त्यानंतर न्यायालयाने हा विवाह रद्द करून पतीला घटस्फोट मंजूर केला. या जोडप्याने 2007 मध्ये लग्न केले होते त्यानंतर पतीने 2012 मध्ये घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने 13 जानेवारी 2017 रोजी पतीची याचिका फेटाळली होती.
आपल्या याचिकेत याचिकाकर्त्याने दावा केला आहे कि, लग्नानंतर त्याची पत्नी नेहमीच त्याला काळ्या रंगावरून हिणवत होती. तसेच काळा माणूस म्हणून टोमणे मारून अपमानित करत होती. पण आपल्या लहान मुलीकडे बघून मी आपला अपमान सहन केला. त्याच्या पत्नीने 2011 मध्ये आपल्या आई आणि कुटुंबातील सदस्यांविरुद्ध तक्रारही नोंदवून आपल्याला 10 दिवस पोलिस स्टेशन ठेवण्यात आले होते, असा दावाही त्याने केला.