K Chandrashekar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी निवडक कोअर कमिटीसह विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं.तर मंत्र्यांसह, आमदार खासदारांना मात्र बाहेरुनच नामेदव पायरीचे दर्शन घ्यावं लागलं. यावेळी मंदिर परिसरात वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली. मात्र वारकऱ्यांशी केसीआर यांना संवाद साधता आला नाही. हे दर्शन घेतल्यानंतर ते सरकोली येथे जाणार आहेत.याठिकाणी भगीरथ भालके हे बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा बीआरएस पक्षात प्रवेश होणार आहे.यामुळे राष्ट्रवादीला हा धक्का मानला जात आहे. पंढरपुरच्या वारीच्या निमित्ताने केसीआर यांनी शक्तिप्रदर्शन करून राजकीय शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न दाखवला असल्याचं बोललं जात आहे. अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.केसीआर यांचे काल सोलापुरात आगमन झालं. त्यांच्यासोबत त्यांचं आख्ख मंत्रिमंडळ सोलापुरात आले होते.आज सकाळी केसीआर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाचं दर्शन घेतलं.