Terror of leopards in the palm; Bhar is inhabited
तळवणे रवळनाथवाडी, माऊली टेंबवाडी ,भाटलेवाडी येथे भर वस्तीत संध्याकाळी व रात्रीच्या वेळी बिबट्याची दहशत वाढली आहे . गेले आठ ते दहा दीवस संध्याकाळी व रात्री च्या वेळी बिबट्याचे दर्शन होत आहे . त्यामुळे संध्याकाळी सहा वाजण्याच्या नंतर येधील रहीवाशांना बाहेर पडणे मुश्कील बनले आहे . बिबट्या आपली भुक भागवण्यासाठी तेथील रहिवाशाचे पाळीव कुत्रे खात आहे. त्यामुळे लवकरात लवकर बिबट्याचा वनखात्याने लवकरात लवकर लक्ष घालून बिबट्याचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी नागरीकांच्या वतीने तळवणेचे सरपंच गोवींद (समीर) केरकर व उपसरपंच रामचंद्र गावडे व पंचसदस्य सिद्धेश कांबळी व सावळाराम घाटये व रेश्मा टाक्कर यांनी मागणी केली आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी