परुळे ( प्रतिनिधी )
रिक्षा युनियन परुळे बाजार ,उद्धव ठाकरे सेना व शिंदे गट सेनेमधील मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेण्यात आला. वेंगुर्ले तालुक्यातील परूळे पंचक्रोशीतील शेकडो ठाकरे व शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे पालकमंत्र्यानी स्वागत केले. माजी सभापती निलेश सामंत यांच्या कामावर प्रभावित होऊन बहुसंख्य कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला. परुळे चिपी विमानतळावरून एअरलाइन्सच्या अनियमित विमानसेवेमुळे या परिसराची नाचक्की होत आहे. यामुळे तात्काळ या कंपनीचा ठेका काढून नवीन कंपनींना विमान सेवा सुरू करण्याची संधी द्यावी व डेली विमान विमानतळावर सुरू व्हावे व परिसरातील रस्त्यांचे तात्काळ डांबरीकरण व्हावे अशी मागणी निलेश सामंत यांनी केली. या मागणीची दखल घेऊन ४ डिसेंबरला देशाचे पंतप्रधान या भूमीत येत असून त्या अगोदर सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन पालकमंत्री श्री चव्हाण यांनी दिले. परुळे येथे झालेल्या कार्यक्रमात आ . निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, प्रदेश उपाध्यक्ष प्रसन्न देसाई,तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा कार्यकारीणी सदस्य मनवेल फर्नाडीस, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, सरपंच संघटनेचे पप्पू परब, माजी सभापती निलेश सामंत, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत ,युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर, परुळे बाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुधवडकर ,माजी सरपंच तथा सदस्य प्रदिप प्रभु भोगवे, उपसरपंच रुपेश मुंडये, माजी सरपंच सुनील राऊत ,शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे, सुनील चव्हाण, प्रकाश राणे, गुरुनाथ मडवळ, चिपी उपसरपंच प्रकाश चव्हाण साईनाथ माडये, यांसह बहुसंख्य भाजपा कार्यकर्त उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भाजपा पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्याचे स्वागत केले. व त्यांना पक्षात काम करताना योग्य तो सन्मान दिला जाईल असे आश्वासित केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, कार्यावर प्रभावीत होऊन भाजपा पक्षात काम करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आपण सर्वजण एक कार्यकर्ता म्हणुन काम करून पक्षाला वाढीसाठी प्रयत्न करूया. असे मत व्यक्त केले