इस्लामाबाद
डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य आता नीचांकी स्तरावर पोहोचले आहे. इंटरबँक बाजारात पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत नीचांकी म्हणजेच 188.35 रुपयांपर्यंत घरगंळला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून सहाय्यनिधी देण्यास होणारा विलंब, अन्य देशांकडून आर्थिक मदत न मिळणे, विदेशी चलन साठय़ा वेगाने होणारी घट आणि व्यापारी तुटीमुळे देशाच्या चलनावर दबाव आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 6 अब्ज डॉलर्सच्या पॅकेजसाठी 5 अटी ठेवल्या होत्या. यात इंधन आणि विजेवरील अनुदान मागे घेण्याचा मुद्दा सामील आहे. नवे सरकार हे अनुदान हटविण्यास टाळाटाळ करत असल्याने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदतनिधी मिळू शकलेला नाही. पाकिस्तानचा विदेशी चलन साठा आता कमी होत 10.558 अब्ज डॉलर्सवर आला आहे.