बेळगाव- महाराष्ट्रातील लोक तसेच नेते मंडळींना महाराष्ट्र, कर्नाटक सीमा प्रश्नाचा विसर पडत आहे. येथील लोक हे मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी 66 वर्षांपासून लढा देत महाराष्ट्रात जाण्याची आपली तीव्र इच्छा व्यक्त करत आहेत. परंतु महाराष्ट्रात मात्र केवळ ठराव मांडून त्यांना वार्यावर सोडले जात आहे. सीमावासीयांच्या व्यथांवर केवळ ठराव मांडून चालणार नाहि तर ठोस भूमिका मांडा, असे प्रतिपादन कोल्हापूरचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी व्यक्त करत महाराष्ट्र सरकारला घरचा आहेर दिला. काळय़ादिनानिमित्त काढण्यात आलेल्या सायकल फेरीनंतर मराठा मंदिर येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, मनोहर किणेकर उपस्थित होते. ते म्हणाले, बेळगावचा सीमाप्रश्न हा देशातील सर्वात मोठा चाललेला लढा आहे. आज चौथी पिढी सीमा प्रश्नासाठी लढा देत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सातत्याने सीमा खटल्यासाठी पाठपुरावा करीत असतात. येत्या ग्राम पंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, आमदार, खासदारकीच्या निवडणुकांमध्ये म. ए. समितीचा भगवा झेंडा फडकेल याची प्रत्येकानेच काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
Related Posts
Add A Comment