पहिल्या रेल्वेगेटवरील प्रकार
प्रतिनिधी /बेळगाव
चालकाचे नियंत्रण सुटून कार रेल्वेरूळावर चढल्याची घटना रविवारी सकाळी पहिल्या रेल्वेगेटजवळ घडली आहे. दिवसभर यासंबंधीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
‘तरुण भारत’ने यासंबंधी बेळगाव रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला असता रविवार दि. 10 जुलै रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कार रेल्वेरूळावर चढल्याची घटना घडली आहे. काही नागरिकांनी कार उचलून बाजूला काढली, असे पोलिसांनी सांगितले.