घटप्रभा:नियंत्रण सुटलेली टाटा नेक्सान कार घटप्रभा नदीत पडल्याने झालेल्या अपघातात दोघे जण थोडक्यात वाचल्याची घटना गोकाक तालुक्यातील घटप्रभा येथे घडली आहे.
या कारमध्ये बनहट्टी येथील हळद व्यापारी खलील राजन्नवर आणि मलिक मुल्ला हे दोघे प्रवास करीत होते. कार कालव्यात पडता क्षणी दोघांनी कारचा दरवाजा उघडला. त्यापैकी मलिक मुल्ला यांना पोहायला येत असल्याने ते काठावरती पोहत आले मात्र खलील राजन्नवर यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यातून वाहत जात होते. हे तेथील चेतन विठ्ठल ओडेयर यांनी पहिले आणि आपल्या जीवाची पर्वा न करता तुडुंब भरलेल्या कालव्यात उडी घेऊन खलील यांचा जीव वाचविला.
स्थानिकांतून चेतन ओडेयर यांच्या धैर्याची प्रशंसा होत आहे.