खरेदी करण्यापूर्वी करावा लागतो मोठा विचार
काही फळे प्रत्येक हंगामात महाग ठरत असतात. परंतु काही फळांची किंमत त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे हजारो अन् लाखो रुपयांमध्ये असते. अशाचप्रकारे एका स्ट्रॉबेरीच्या विशेष प्रजातीचे एक फळ 29 हजार रुपयांमध्ये विकले जाते.
बिजिन हाइम नावाची स्ट्रॉबेरी स्वत:चा आकार, स्वाद आणि रंगासोबत स्वत:च्या किमतीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. याला जगातील काही सर्वात महाग फळांच्या श्रेणीत सामील करण्यात आले आहे. जपानमध्ये या विशेष प्रकारच्या स्ट्रॉबेरीचे पिक घेतले जाते, याला तेथे ब्युटीफुल प्रिन्सेस नाव देण्यात आले आहे.
बिजिन हाइम नावाच्या या स्ट्रॉबेरीला जपानी शेतकरी मिकियो ओकुदा यांनी विकसित केले होते. 45 वर्षांपर्यंत ओकुदा हे केवळ स्ट्रॉबेरीचे पीक घेत होते. 15 वर्षांपर्यंत संशोधन अन् निरंतर प्रयत्नानंतर ओकुदा यांनी बिजिन हाइम नावाची ही प्रजाती विकसित केली. बिजिम हाइम ही जगातील सर्वात महाग स्ट्रॉबेरी आहे. याचे सर्वात मोठे फळ 100 ग्रॅमचे असू शकते. याचा आकार एखाद्या टेनिस बॉलइतका असतो. सर्वसाधारणपणे मोठ्या आकाराची स्ट्रॉबेरी कमी गोड असते. परंतु बिजिन हाइमसोबत असा प्रकार नाही. त्याच्या फ्लेवरवर कुठलाच प्रभाव पडत नाही आणि याला वेगळा गंध असतो.
या विशेष स्ट्रॉबेरीचा सुंदर लाल रंग आणि चमकदार टेक्स्चर पाहून तो खावासा वाटतो. तसेच हा अधिक नरम आणि कठोरही नसतो. यात अॅसिड कमी आणि गोडपणा अधिक असतो. मिकियो ओकुदा या विशेष प्रजातीचे पीक हिवाळ्यात ग्रीनहाउसमध्ये घेत असतात. हे फळ हळूहळू पिकत असते. ओकुदा यांनी 15 क्रॉस ब्रीडिंग केल्यावर ही विशेष प्रजाती तयार केली आहे. एका लिलावादरम्यान या प्रजातीच्या एका स्ट्रॉबेरीला 350 युएस डॉलर्स म्हणजेच 29 हजार रुपयांची किंमत मिळाली होती.