डिचोली : डिचोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाला लागून सुकलेल्या अवस्थेत असलेला भला मोठा आम्रवृक्ष अखेर डिचोली नगरपालिकेने गंभीर दखल घेत हटविला. सदर सुक्मया आम्रवृक्षाच्या सुकलेल्या फांद्या रस्त्यावर कोसळत होत्या. त्यामुळे या भागात रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यासमोर सदर आम्रवृक्ष बऱ्याच दिवसांपासून सुकलेल्या स्थितीत उभा होता. रस्त्यावर व मैदानावरही येणाऱ्या लोकांसाठी धोकादायक बनला होता. हा वृक्ष हटविण्यासाठी शासकीयस्तरावर सर्व प्रकारची मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर मंजुरी मिळाल्यानंतर पालिकेने रविवारी तो आम्रवृक्ष हटविला. यावेळी नगराध्यक्ष कुंदन फळारी हे जातीने उपस्थित होते.
Previous Articleपुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी
Next Article भोम येथील मैदानाच्या विस्तार कामाला प्रारंभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.