बेळगाव : फूल मार्केट परिसरात आढळलेला मोबाईल फेसबुक फ्रेंड सर्कलच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधितांना परत केल्याची घटना रविवारी घडली. या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे. फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर व दिनेश कोल्हापुरे यांना रविवारी सकाळी फूल मार्केट परिसरात विवो कंपनीचा एक मोबाईल आढळला. लगेच त्यांनी तो मार्केट पोलीस स्थानकात नेऊन सकाळी सेवेत असलेले हवालदार एस. एस. भद्रशेट्टी यांच्याकडे सुपूर्द केला. मोबाईल स्क्रीन लॉक असल्याने तो कोणाचा, याचा शोध घेणे सुरुवातीला कठीण गेले. त्याच मोबाईलवर आलेल्या फोन कॉलवरून मूळ मालकाचा शोध लागला. तो शहाबाज नामक गृहस्थाचा असल्याचा आढळून आले. मार्केट पोलिसांनी संबंधितांना तो परत केला.
Previous Articleनागरिक ‘भारत तांदूळ’च्या प्रतीक्षेत : पुरवठा कधी?
Next Article महाद्वार रोड परिसर दोन दिवसांपासून होता अंधारात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.