अध्याय सोळावा
तसं बघायला गेलं तर भगवंत सर्वव्यापी आहेत पण उद्धवाच्या विनंतीवरून भगवंत त्याला स्वतःच्या प्रमुख विभूती सांगत आहेत. विभूती म्हणजे अशा वस्तू, व्यक्ती वा ठिकाणं जेथे भगवंतांचं अस्तित्व ठळकपणे जाणवतं. सुरवातीला ते म्हणाले, उद्धवा, मी सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात राहणारा सर्वांचा सुहृद व सोयरा असून मी ईश्वरसत्तेचा नियामक आणि मीच एक प्राणिमात्रांचा शास्ता आहे. अशा प्रकारे सर्व प्राणिमात्रांचा मी धनी आहे.
शेतकऱयाप्रमाणे मी निर्माण करणारा व पालन करणारा व संहार करणारा आहे.
कर्माची जी क्रियाशक्ती आहे तिही मीच आहे. ही सामान्य स्वरूपे सांगितली. आता ज्या विशेष विभूती आहेत त्या ऐक. गतीशील पदार्थांची गती मी आहे. गणना करणाऱयांमध्ये काळ मी आहे. गुणांची साम्यावस्था जी प्रकृती, ती मी आहे. गतीमंतांमध्ये गती आणि त्यासाठी लागणारी चेतनाही माझीच शक्ती आहे. चेतनेपासूनच इंद्रियांची प्रवृत्ती होते. साऱया गतीत श्रे÷ गती म्हटली म्हणजे मुख्यत्वेकरून प्राण्याला मुक्ती मिळणे ही होय. देवांना आणि मनुष्यांनाही मर्यादेत ठेवणारी एक ‘काळाची सत्ता’ आहे. पण त्या काळालाही मर्यादेत ठेवणारा महाकाळ तो मी होय. सूक्ष्म वस्तूंमध्ये जीव मी आहे.
अजिंक्मय वस्तूंमध्ये मन मी आहे. जगामध्ये आकाश हे सर्वांत थोर आहे. पण तेसुद्धा माझ्यामध्ये लपंडाव खेळते. अजिंक्मय वस्तूंमध्ये मन ते मी. मनाला जिंकावयाला माझ्याशिवाय कोणालाच पूर्ण सामर्थ्य नाही. माझे स्मरण केले असता मन ताळय़ावर येते आणि मला विसरले की, मन
चवताळते.
वेदांचे अध्यापन करणारा प्रसिद्ध असा जो ब्रह्मदेव तो मी आहे. माझ्यामुळेच जगामध्ये वेदाचे उल्लंघन करता येत नाही. ओंकाराशिवाय कितीही मंत्र असले तरी ते पोरांच्या गोष्टीप्रमाणेच निष्फळ होत. मी श्रीकृष्ण हाच मंत्रांमधील ओंकार आहे, त्याच्यामुळेच सारे मंत्र पावन झाले. छंदांमध्ये गायत्री छंद तो मी. म्हणून ब्रह्मवृंद त्या गायत्री मंत्राचे सेवन करतात. सर्व द्वंद्वांमध्ये निर्द्वंद्व तो मी आहे. सर्व देवांमध्ये इंद्र, आठ वसूंमध्ये अग्नी, बारा आदित्यांमध्ये विष्णू आणि अकरा रूद्रांमध्ये शंकर मी आहे. मी ब्रह्मषर्मींध्ये भृगू, राजषीमध्ये मनू, देवषीमध्ये नारद आणि गाईंमध्ये कामधेनू आहे. मी सिद्धेश्वरांमध्ये कपिल, पक्ष्यांमध्ये गरूड, प्रजापतींमध्ये दक्ष प्रजापती मी आहे आणि पितृगणामध्ये श्रे÷ जो अर्यमा तो तर माझेच प्रत्यक्ष स्वरूप आहे.
हे उद्धवा ! मी दैत्यांमध्ये दैत्यराज प्रह्लाद, नक्षत्रांचा आणि वनस्पतींचा राजा चंद्र आणि यक्षराक्षसांमध्ये मी कुबेर आहे. गजेंद्रांमध्ये ऐरावत नावाचा हत्ती, जलचरांचा राजा वरूण, तापणाऱया आणि प्रकाश देणाऱयांमध्ये सूर्य आणि मनुष्यांमध्ये राजा मी आहे. मी घोडय़ांमध्ये उच्चैःश्रवा, धातूंमध्ये सोने, दंड करणाऱयांमध्ये यम आणि सर्पांमध्ये वासुकी आहे. हे पुण्यशील उद्ववा ! मी नागराजांमध्ये शेषनाग, आश्रमांमध्ये संन्यास आणि वर्णांमध्ये ब्राह्मण आहे. सर्व घोडय़ांमध्ये श्रे÷ उच्चेःश्रवा तो मी आणि ज्याच्यासाठी त्रैलोक्मय धडपड करते, ते सोनं मीच आहे.
शासन करणाऱयांमध्ये श्रे÷ शासन करणारा यमधर्म तो मी स्वतःच आहे. मी सर्पामध्ये वासुकी आहे. नागांमध्ये अनंत हे नाव जो धारण करतो, तो नाग मी. नखे, दाढा व शिंगें धारण करणारी जी श्वापदे, त्यामध्ये सिंह तो मी असे देव म्हणाले. चारही आश्रमांमध्ये संन्यास तो मी. वर्णामध्ये श्रे÷ व चालतेबोलते ब्रह्म म्हणजे ब्राह्मण तो मीच. पवित्र नद्यांमध्ये गंगोदक ते मी. सरोवरांमध्ये श्रे÷ सरोवर म्हणजे समुद्र, तो पूर्णपणे मी आहे.
आयुधांमध्ये धनुष्य नामक हत्यार ते मी आणि ज्याने त्रिपुरांचा संहार केला, तो त्रिपुरशत्रु धनुर्धर मी होय. मी निवासस्थानांमध्ये सुमेरू पर्वत, दुर्गम स्थानांमध्ये हिमालय, वनस्पतींमध्ये पिंपळ आणि धान्यांमध्ये सातू आहे. मी पुरोहितांमध्ये वसि÷, वेदवेत्त्यांमध्ये बृहस्पती, सर्व सेनापतींमध्ये कार्तिक स्वामी तसेच सन्मार्गप्रवर्तकांमध्ये भगवान ब्रह्मदेव आहे. वेदवेत्त्यांमध्ये अग्रगण्य जो श्रे÷ देवगुरु बृहस्पति तो मी.
क्रमशः